कोचिंग क्लासेस सुरु करा; क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची घेणार भेट

कोचिंग क्लासेस सुरु करा; क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची घेणार भेट

मुंबई | राज्यात मिशन बिगेन अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्यात. तर आता कोचिंग क्लासेस सुरु करण्यात यावेत अशी मागणी केली जातेय. यासाठी कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहे.

राज्यात लॉकडाऊनमुळे अकरावीचा प्रवेश रखडलाय. यातच आर्थिक परिस्थितीमुळे कोचिंग क्लासेसच्या मालकांची आर्थिक परिस्थिती कठीण झालीये. या पार्श्वभूमीवर पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक - शिक्षकांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची कृष्णकुंजवर ही भेट घेणार आहेत.

या भेटीदरम्यान कोचिंग क्लासचे मालक त्यांच्या मागण्या राज ठाकरेंकडे मांडणार आहेत. या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ राज ठाकरेंना विनंती करणार आहेत.