रितेशने शेअर केली जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाची आठवण!

रितेश देशमुख-जेनेलिया यांनी पहिल्यांदा डेटवर गेल्यावर पाहिला चित्रपट

रितेशने शेअर केली जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाची आठवण!

बॉलिवडूमधील सेलिब्रिटींबाबत त्यांच्या चाहत्यांच्या मनात नेहमीच एक प्रकारचे आकर्षण, कुतूहल असते. ते अनेकदा चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादातून दिसतेही. आपला आवडता अभिनेता-अभिनेत्री काय करतो, याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात असते. अशाच उत्सुकतेतच रितेशने जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाबाबत सांगितले आहे. ''आम्ही जेव्हा पहिल्यांदा डेटवर गेलो होतो तेव्हा आम्ही 'कभी खुशी, कभी गम' चित्रपट पाहिला.

'कभी खुशी, कभी गम' या चित्रपटाला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ट्विटरवर #KabhiKhushiKabhieGham हा ट्रेंड सुरु झाला होता. या चित्रपटात 'बिग बी' अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री आणि त्यांची पत्नी जया बच्चन, 'किंग खान' शाहरूख खान, काजोल, करिना कपूर आणि हृतिक रोशन यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर यांनी केले आहे. या चित्रपटात घराघरातील अनुभवाचे कथन केले आहे.

 

 

 

ट्विटरवर हा ट्रेंड सुरु झाल्यानंतर रितेशने या ट्विटला रिप्लाय देत आपल्या पहिल्या चित्रपटाबाबत सांगितले. यामध्ये त्याने सांगितले, की मी आणि जेनेलिया आम्ही दोघे पहिल्यांदा जेव्हा डेटवर गेलो होतो, तेव्हा आम्ही दोघांनी 'कभी खुशी, कभी गम' हा चित्रपट पाहिला. या चित्रपटातील 'सूरज हुवा मध्धम' हे आमचे रिलेशनशिप दर्शवणारे गाणं वाटले.

तसेच दिग्दर्शन करण जोहरने या चित्रपटाचे काही व्हिडिओही ट्विटरवरून शेअर केले आहेत. अभिनेता अभिषेक बच्चन यानेदेखील या चित्रपटाचे ट्विट पाहिल्यानंतर त्याने ट्विटला रिप्लाय देत लिहिले, की 'कभी खुशी, कभी गम' हा नेहमी प्रसिद्ध असलेला चित्रपट आहे. अभिनंदन.