आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त पंढरीत 14 फेब्रुवारी रोजी सामुदायीक विवाह सोहळ्याचं आयोजन

Hpn

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त पंढरीत 14 फेब्रुवारी रोजी सामुदायीक विवाह सोहळ्याचं आयोजन
राघोजी भांगरे

 

पंढरपूर (प्रतिनिधी):- आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी पंढरीत कोळी महादेव जमातीच्या सामुदायीक विवाह सोहळ्याचं आयोजन केले असल्याची माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

या वर्षी महाराष्ट्रावर आस्मानी संकट कोसळले. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात होत्याचे नव्हते झाले. शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर या परिस्थितीमुळे प्रतिकुल परिणाम झाला. यामुळे समाजातील वधु-वरांचे विवाह धुमधडाक्यात साजरे करणे अशक्य बनले आहे. आई-वडीलांना आपल्या उपवर मुलांच्या विवाहाची चिंता लागुन राहिलेली असते. याचा सारासार विचार करुन महर्षी वाल्मिकी संघाने या सामाजिक जबाबदारीचं भान राखुन आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीचं औचित्य साधुन सामुदायीक विवाह सोहळ्यामध्ये समाजातील उपवर वधु-वरांना रेशीमगाठीत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.  शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी वाल्मिकी भवन (नाट्यगृह), आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेजवळ, क्रांती चौक, कोळी गल्ली, पंढरपूर येथे हा सामुदायीक विवाह सोहळा संपन्न होईल. या विवाह सोहळ्यासाठीची नावे नोंदणी चालु असुन समाजातील इच्छुकांनी वाल्मिकी भवन (नाट्यगृह), आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेजवळ, क्रांती चौक, कोळी गल्ली, पंढरपूर येथे वधु-वरांच्या नावांची नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

जयंतीनिमित्तच्या इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामुदायीक विवाह सोहळ्याच्या रुपाने हे विधायक मंगल कार्य घडवुन आणताना आम्हास नितांत आनंद होत आहे. आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी व नव वधु-वरांना आशिर्वाद देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अशी विनंती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे.