क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

प्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव

हदगांव:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिलांच्या हक्कांसाठी प्रथम शिक्षीका म्हणून त्यांचे शिक्षणासाठी मोठे योगदान दिले असल्याने त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. हदगाव तालुक्यासह  बरडशेवाळा, पळसा मनाठा बामणी फाटा परीसरात ठिक ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा ,महाविद्यालयात , विविध कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर चक्रवर्ती अशोक विद्यालय पळसा येथे सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करत शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना  त्यांच्या  जिवनावर  शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी भाषण आयोजित केली होती.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकदा पैक्षा एक भाषण केले शालेय   मुलीनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा प्रधान केल्याने एक आकर्षण ठरल्या होत्या.
यावेळी   चक्रवर्ती अशोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गंगमवार मडम , शाळेचे शिक्षक काकडे,जावरकर,तुपेकर,एंकमवार , चिंचोलकर,पत्तेवार , वानखेडे , रणवीर , शिक्षीका बुरांडे ,भलगे ,पंतगे यांच्या सह विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.