अकलूज, माळशिरस व नातेपुते येथील शासकीय धान्य गोदामातील हमाल व मुकादमांची आर्थिक दैना

अकलूज, माळशिरस व नातेपुते येथील शासकीय धान्य गोदामातील हमाल व मुकादमांची आर्थिक दैना

माळशिरस तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम अकलुज, माळशिरस व नातेपुते येथील कोविड १९ मधील बिले मिळाली नसल्याने शासकीय हमाल व त्यांचे मुकादम यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे.थकीत बिले न मिळाल्याने कामगारांनी 17 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

माळशिरस येथील शासकीय धान्य गोदामातील मुकादम व हमाल ज्ञानदेव किसन पिसे,नितीन पोपट पिसे,विकिराज शिवाजी पिसे,सौरभ संतोष पिसे,संदीप ज्ञानदेव पिसे,किसन श्रीमंत पिसे आदी कामगारांनी मिळून उपजिल्हाधिकारी पुरवठा विभाग सोलापूर यांना निवेदन देण्यात आले आहे.


उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकलुज माळशिरस व नातेपुते गोदामाचे मुकादम तसेच हमाल यांचा पगार हा २०२० मध्ये कोविड १९ ची मोफत धान्याची हमाली एप्रिल २०२० ते माहे नोव्हेंबर २०२० या कालावधीत केलेली आहे. तसेच फेब्रुवारी- मार्च एप्रिल व मे महिन्यातील हमाली 260 दिवसांची आहे.नियमित केलेल्या हमाली कामाची बिले आजतागायत मिळालेली नाहीत.यामुळे आम्हा सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली असताना आपले कार्यालयाकडून आमचे कामाचे बिले मिळणे बाबत कोणतीही कार्यवाही अजुन झालेली नाही.


आपण यामध्ये लक्ष घालुन आमची बिले मिळणेची हमी घ्यावी व आमची बिले १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत मिळणेची तजबिज करावी. आपण स्वतः लक्ष घालुन आमची श्रीराम मागासवर्गीय हमाल कामगार मजुर सहसंस्था मर्या. अक्कलकोट चे चेअरमन श्री. चवडाप्पा गुराण्णा यारोळे यांच्या कडून बिले काढण्याचा आदेश मिळावा. १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत आमची वर उल्लेख केलेली बिले आंम्हाला न मिळालेस १७ ऑगस्ट पासून काम बंद चे आंदोलन केले जाईल, त्यासाठी होणारे परीणामास आपण जबाबदार असाल.


आम्ही या पूर्वी वरिष्ठांकडे बिलाची वारंवार मागणी केली होती परंतु संबंधितांनी त्याकडे कानाडोळा केला असल्यामुळे आज आमच्यावर पोटासाठी कष्टाचे काम करून सुद्धा उपासमारीची वेळ आमच्या कुटुंबावर आलेली आहे. आपण स्वतः लक्ष घालुन आमची बिले मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्हाला आमची बिले वेळेत न मिळालेस आमचेवर आत्महत्या करणेची वेळ येईल.तशी आमच्यावर वेळ येऊ नये याची काळजी घेऊन आपण आमची बिले १५ ऑगस्ट २०२१ चे आत मिळावेत अशी व्यवस्था करावी अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी सोलापूर ,प्रांत अधिकारी अकलूज,सोलापूर,तहसीलदार माळशिरस यांना निवेदने देण्यात आली आहेत.

जोपर्यंत कामगारांचे पगार होत नाही,तो पर्यंत काम बंद राहणार.अकलूज ,नातेपुते ,माळशिरस येथील गोडवान चे काम बंद म्हणजे बंद.जोपर्यंत शासकीय धान्य गोदामातील  कामगारांचे पगार होणार नाहीत तोपर्यंत कुठलेही काम करणार नाही आणि करू ही देणार नाही असा इशारा   हमाल माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिला आहे.