सोलापूर भाजपा, एम आय एम आणि मनसेच्या वितरोधात सर्वपक्ष एक व्हा नरसय्या आडम मास्तर...

सोलापूर भाजपा, एम आय एम आणि मनसेच्या वितरोधात सर्वपक्ष एक व्हा  नरसय्या आडम मास्तर...

सोलापूर: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आगामी महापालिका निवडणूकीसाठी 'बहुसदस्यीय प्रभाग पद्धत' जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुषंगाने सोलापूर महापालिकेची निवडणूक ही 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे.
त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा, एम आय एम आणि मनसे यांच्या विरुद्ध सर्व राजकीय पक्षाने येण्याचा सल्ला जेष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे.
भाजपा, एम आय एम आणि मनसे हे जातीयवादी पक्ष आहेत त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट विचारांचे पक्ष आणि अन्य लहानसहान पक्षांनी एकत्रित येत सोलापूर महापालिकेमध्ये एक वेगळा पॅटर्न निर्माण व्हावा असं मत आडम मास्तर यांनी व्यक्त केल आहे.दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या 'बहुसदस्यीय प्रभाग पद्धती'चा आडम मास्तर यांनी निषेध केला आहे.या पद्धतीमुळे सामान्य लोकांसाठी खऱ्याअर्थाने काम करणारा गरीब उमेदवार मागे पडतो आणि पैसेवाला उमेदवार निवडून येतो,त्यामुळे ही पद्धत बदलून एक सदस्य एक वर पद्धत अमलात आणावी यासाठी महाविकास आघाडी सरकारला विनंती करणारं असल्याच ही आडम मास्तर यांनी जाहीर केल.