१ जून पासून सोलापूर जिल्ह्यात काय सुरू काय बंद? पहा सविस्तर

दि . ३०,०५,२०२१ च्या आदेशान्वये राज्यात कोव्हीड -१ ९ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोव्हीड -१ ९ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्यासाटी यापूर्वी लागू करण्यात आलेले निबंध दिनांक ०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा . पासून ते दि . १५.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा . पर्यंत कायम करण्यात आलेले आहेत .
त्याअर्थी , मी मिलिंद शंभरकर जिल्हादंडाधिकारी , सोलापूर , फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७२ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सोलापूर जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हह वगळून ) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना ( कोव्हीड . १ ९ ) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटणेसाठी दिनांक ०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा . पासून ते दि . १५.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा . पर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करत आहे .
1. फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी लागू करणे : a . संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ( पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद वगळून ) फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ लागू करण्यात येत आहे . २ . खाली नमुद केलेल्या वैध कारणाव्यतिरिक्त नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही , ३. या आदेशामध्ये नमुद केलेल्या व सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा / आस्थापना वगळून सर्व सार्वजनिक ठिकाणे , सेवा या बंद राहतील .
अत्यावश्यक सेवा म्हणून खाली नमुद केलेल्या सेवा आणि उपक्रम हे या आदेशामधून वगळण्यात येत असून त्याबाबतची सर्व कामे व वाहतुक सुरळीत चालू राहील . या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अपवादात्मक सुट दिलेल्या वर्गवारीमध्ये समाविष्ठ केलेल्या सेवा आणि आस्थापना यांना कामाच्या दिवशी सकाळी 7.00 वा . ते रात्री 8.00 वा . या दरम्यान सुट देणेत आलेली असून त्यांच्या हालचाली व सेवा सुरू ठेवणेविषयी नमूद केलेल्या कालावधीमध्ये प्रतिबंध असणार नाही .
सुट दिलेल्या श्रेणीतील घरगुती काम करणारे कर्मचारी / वाहनचालक / परिचर यांच्या बाबतीतचा निर्णय स्थानिक परिस्थीती पाहून स्थानिक प्रशासना मार्फत घेण्यात येईल ,
अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या बाबी समाविष्ट असतील . :
1 ) हॉस्पीटल , डायग्नॉस्टिक सेंटर , क्लिनीक , लसीकरण , वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये , फार्मसी , फार्मसी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन व वितरण करणारे घटक तसेच त्यासंबंधी डिलर्स आणि त्यांची वाहतुक व वितरण तसेच लसी , सॅनिटायझर , मास्क , वैद्यकिय उपकरणे व त्याच्याशी निगडीत सर्व सहायक बाबी , कच्च्या मालाचे उत्पादन घटक आणि त्यासंबधित सेवा यांचा समावेश असेल .
2 ) पशुवैद्यकिय सेवा / पशुसंगोपन केंद्र
3 ) सर्व किराणा दुकाने , भाजीपाला दुकाने , फळांची दुकाने , डेअरी , बेकरी , कन्फेक्शनरी आणि सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांची दुकाने ( चिकन , मटन , कोंबडया , मासे व अंडी यांचेसह ) , पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने सकाळी ०७.०० ते ११.०० वा . पर्यंत चालू राहतील ,
4 ) शितगृहे आणि वखार विषयक सेवा ,
5 ) सार्वजनिक वाहतूक : – विमानवाहतुक , रेल्वे , टॅक्सी , ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस
6 ) विविध देशांच्या राजदुतांची कार्यालयांशी संबंधीत सेवा ,
7 ) स्थानिक प्रशासनामार्फत करावयाची मान्सून पूर्व कामे ,
8 ) स्थानिक प्रशासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा
9 रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व बैंक ऑफ इंडिया ने अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या सर्व सेवा .
10 ) SEBI आणि SEBI ने मान्यता दिलेले मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टीट्युशन जसे की स्टॉक एक्चेज , डिपॉझीटरीज आणि क्लेरीग कार्पोरेशन तसेच SEBI शी रजिस्टर असलेल्या इंटरमेडीअरीज ,
11 ) टेलिकॉम सेवेशी संबंधित असणा – या / देखभाल दुरुस्ती विषयक सेवा ,
12 ) मालवाहतूक
13 ) पाणीपुरवठा विषयक सेवा
14 कृषी निगडील सेवा आणि कृषी उत्पादन विषयक सर्व सेवा सुरळित सुरु राहण्यासाठी बियाणे , खते , कृषी अवजारे व त्यांची दुरूस्ती त्यांचेशी संलग्नित सर्व उपक्रम चालु राहतील , सदर आस्थापनांची वेळ सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वा . पर्यंत राहील ,
15 ) सर्व व्यापारी माल ( Commodity ) संयमित आयात निर्यात
16 ) ई – कॉमर्स ( केवल अत्यावश्यक सेवा व मालाच्या पुरवठ्यासाठी )
17 ) प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी .
18 ) पेट्रोलपंप आणि पेट्रोलिभमशी निगडीत ऑफशोअर । आनशोअर उत्पादने
19 ) सर्व प्रकारच्या कागो सेवा 20 ) डेटा सेंटर / क्लाऊड सेवा / माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत क्रिटीकल इन्फास्ट्रक्चर आणि संबंधित सेवा
20 शासकिय आणि खाजगी सुरक्षा सेवा
22 ) इलेक्ट्रीक आणि गॅस पुरवठा सेवा
23 ) बैंक ATM 24 ) पोष्ट सेवा 25 ) बंदर आणि बंदराशी निगडीत सेवा ,
26 ) कस्टम हाऊस एजंट । लसीच्या जीवरक्षक औषधे / फार्मास्यूटीकल उत्पादन वाहतुर्कासंबंधित असणार लायसन्स धारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटरर्स ,
27 ) अत्यावश्यक सेवेला पुरवठा करणा – या कच्चा माल / पैकेजिंग मटेरिअल पुरवठा करणा – या सेवा .
28 ) येऊ घातलेल्या पावसाळयाकरिता वेगवेगळ्या संस्था व वैयक्तिक वापराकरता आवश्यक मालाचे उत्पादन करणारे घटक
29 ) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अत्यावश्यक सवा म्हणून मान्यता दिलेल्या इतर सेवा .