सोलापूर भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वजाचे सोलापुरात स्वागत...

सोलापूर भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वजाचे सोलापुरात स्वागत...

सोलापूर: स्वराज्यातील शेवटची लढाई झालेल्या शिवपट्टण किल्ल्यावर भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभा करण्यात येत आहे.दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्र सह देशातील विविध 74 महत्त्वाच्या धार्मिक , आध्यात्मिक स्थळे , स्मारके , गड-किल्ले आदी ठिकाणी ध्वजाचे पूजन करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर येथे या ध्वजाचे स्वागत आणि पूजन करण्यात आले.

देशाचे भवितव्य असलेल्या युवाशक्तीला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी हा ध्वज सकारात्मक विचार व प्रेरणा देईल.आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळासोबत पुढे जाताना आपली समृद्ध परंपरा ,वारसा जपण्याच ,वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे.एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या स्वराज्य ध्वजाचे विविध संतपीठे , शौर्यपीठे , धार्मिक पिठाच्या ठिकाणी पूजन होत आहे.हा 74 मीटर उंच , 90 किलो वजन आणि 96 × 64 फुट आशा आकाराचा असल्याची माहिती स्वराज्य ध्वज यात्रेचे समन्वयक नितीन गवळी यांनी दिलीय.