बेळगावच्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 8 दिवसात पुन्हा बसवणार !

बेळगावच्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 8 दिवसात पुन्हा बसवणार !

कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील मुख्य चौकात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रशासनानं रातोरात हटवल्यानंतर आज बेळगाव सह पश्चिम महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

दरम्यान, प्रशासनाने पाठवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुनर्स्थापित करावा या मागणीसाठी मनगुत्ती गावासह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यानं दिवसभर मोठा तणाव निर्माण झाला होता.

दोन तासांपेक्षा अधिक काळ स्थानिक, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत आठ दिवसात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.