वडिलांनी मुलीच्या मानेवरुन फिरवला सुरा, केला शिरच्छेद, शिर घेऊन पोलीस ठाण्यात दाखल

वडिलांनी मुलीच्या मानेवरुन फिरवला सुरा, केला शिरच्छेद, शिर घेऊन पोलीस ठाण्यात दाखल

उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात एका माणसाने आपल्याच मुलीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केली आहे. आपल्या तरूण मुलीचा गळा धारदार चाकूने कापून तीचे शीर धडापासून वेगळे केले. इतकेच नाही तर कापलेले शीर घेऊन तो जवळील महिला पोलिस ठाण्यात पोचला. मुलीचे कापलेले शीर हातात घेऊन चालताना त्याला पाहिलेल्या लोकांचा भितीने थरकाप झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

खुनी बापाच्या चेहेऱ्यावर थोडेही पश्चातापाचे भाव नव्हते. याउलट त्यानेच पोलिसांना सांगितले की मीच हिचा गळा कापला आहे. ही घटना मुलीच्या प्रेम प्रकरणातून घडली असल्याचे बोलले जात आहे. हत्या करणाऱ्या बापाने आपल्या मुलीला एका मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि राग अनावर झाल्याने रागाच्या भरात पोटच्या मुलीचे शीर धडापासून वेगळे केले.

मुलीला एका मुलासोबत आक्षेपार्ह्य स्थितित पाहिले

ही घटना पांडे तारा या गावाच्या महिला पोलिस ठाण्याचा अंतर्गत झाली आहे. येथे राहणाऱ्या सर्वेश नावाच्या व्यक्तीने अवैध संबंधांच्या संशयात फावड्याने आपल्या मुलीचा गळा कापून तीची हत्या केली. त्याने दोन दिवसापूर्वी मुलीला एका मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. तेव्हापासूनच त्याच्या डोक्यात राग भरला होता. हा राग अनावर होऊन त्याने आपल्या मुलीचा खून केला. आणि कापलेले शीर घेऊन पोलिसांकडे गेला.

पोलिसांचा अमानुष चेहेराही समोर आला

या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. यादरम्यान पोलिसांनी ते कापलेले शीर केसांना धरून उचलल्याचे पाहण्यात आले. त्यावर शीरावर कसलाच कपडाही झाकला नाही. त्यांच्या अशा वागणुकीवर खूप टीका होत आहे. यामुळे पोलिसांचाही अमानुष चेहेरा आपल्या समोर आला आहे.