Tokyo Olympic 2021 : पैलवान बजरंग पुनिया पदकापासून एक पाऊल दूर, सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश

Tokyo Olympic 2021 : पैलवान बजरंग पुनिया पदकापासून एक पाऊल दूर, सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश

Tokyo Olympic 2021 : भारताने गुरुवारी (5 ऑगस्ट) एका दिवसांत दोन पदकं मिळवल्यानंतर आजही भारताला एक पदक मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया धमाकेदार खेळ करत 65 किलो वजनी गटात सेमीफायनल गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने इराणच्या मोर्तेजा घियासीला  नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पुनिया आणि घियासी यांच्यातील सामना अत्यंत उत्कटांवर्धक झाला. सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू एकमेंकावर तगडे डाव टाकत होते. सामन्याच्या सुरुवातीला घियासीने आघाडी घेतली. पहिल्या डावानंतर बजरंग पुनिया 0-1 ने पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या डावात पुनियाने पुनरागमन करत शेवटच्या काही क्षणात उत्कृष्ट डाव दाखवत घियासीला 2-1 ने धोबीपछाड केले. त्याआधी पुनिया किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमतालीएवचा या पैलवानाला नमवून उपांत्यपूर्व फेरीत आला होता.

बजरंग समोर आता सेमीफायनल जिंकून पदक पक्क करण्याची संधी आहे. त्यासाठी सेमीफायनलमध्ये त्याच्यासमोर अझरबैजानचा हाजी अलीयेब याचं आव्हान आहे. अलीयेवने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल होतं. तसेच 61 किलो वजनी गटात तो तीन वेळा विश्वविजेता राहिला असल्याने पुनियाला त्याच्याविरुद्ध दमदार खेळ दाखवावा लागणार आहे.