Toyota Innova Crysta झाली महाग, पाहा किती वाढली किंमत

टोयोटा इन्वोहा क्रिस्टा कार खरेदी करण्याचा तुमच्या डोक्यात विचार असेल तर तुम्हाला आता या कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण, टोयोटाने आपली कार महाग केली आहे. जाणून घ्या कोणती कार किती महाग झाली तसेच या कारची नवीन किंमत किती आहे.

Toyota Innova Crysta झाली महाग, पाहा किती वाढली किंमत


नवी दिल्लीः Toyota Innova Crysta महाग झाली आहे. Fortuner SUV नंतर कंपनीने आता या पॉप्युलर MPV (मल्टी परपज वीइकल) ची किंमत वाढवली आहे. किंमतीत वाढ केल्यानंतर आता Innova Crysta चे पेट्रोल मॉडलची किंमत १५.६६ लाखांपासून ते २१.७८ लाखांपर्यंत तर डिझेलच्या मॉडलची किंमत १६.४४ लाख ते २३.६३ लाख रुपयांदरम्यान झाली आहे.

टोयोटा इनोव्हाच्या एन्ट्री लेवल व्हेरियंटची किंमत २५ ते ३० हजार रुपयांनी वाढवली आहे. डिझेल ऑटोमॅटिक जीएक्सच्या किंमतीत ६१ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अन्य व्हेरियंट्सच्या किंमतीत जवळपास ४४ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इनोव्हा ७ सीटर आणि ८ सीटर ऑप्शन या दोन पर्यायात येते.

पॉवर
इनोव्हा पेट्रोल आणि डिझेल, या दोन्ही इंजिनात ही कार येते. यात देण्यात आलेले २.७ लीटर पेट्रोल इंजिन १६६ पीएसचे पॉवर आणि २४५ एनएम टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिनात २.४ लीटरचे आहे. जे १५० पीएसचे पॉवर जनरेट करते. दोन्ही इंजिनात ५ स्पीड मॅन्यूअल ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे पर्याय उपलब्ध आहे.

पेट्रोल मॉडलची नवीन किंमत
GX मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १५.६६ लाख रुपये तर ८ सीटरच्या कारची किंमत १५.७१ लाख रुपये आहे. GX ऑटोमॅटिकच्या ७ सीटरची किंमत १७.२ लाख रुपये, ८ सीटरची किंमत १७.७ लाख रुपये, VX मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १९ लाख रुपये करण्यात आली आहे. ZX ऑटोमॅटिकच्या ७ सीटरची किंमत २१.७८ लाख रुपये करण्यात आलीआहे.

डिझेलच्या सर्व मॉडलची नवी किंमत
G मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १६.४४ लाख रुपये तर ८ सीटरची किंमत १६.४९ लाख रुपये आहे. G+ मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १७.९ लाख रुपये तर ८ सीटरची नवी किंमत १७.१४ लाख रुपये. GX मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १७.४७ लाख रुपये तर ८ सीटरची किंमत १७.५२ लाख रुपये झाली आहे. GX ऑटोमॅटिकच्या ७ सीटरची किंमत १८.७८ लाख तर ८ सीटरच्या कारची किंमत १८.८३ लाख रुपये आहे. VX मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत २०.८९ लाख रुपये, ८ सीटरची किंमत २०.९४ लाख रुपये आहे. ZX मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत २२.४३ लाख रुपये झाली आहे. ZX ऑटोमॅटिकच्या ७ सीटरची किंमत २३.६३ लाख रुपये झाली आहे.