कल्याण मध्ये तरुणाची अनोखी शक्कल,ऑनलाईन पूजा करत बाप्पाचे केले विसर्जन

कल्याण मध्ये तरुणाची अनोखी शक्कल,ऑनलाईन पूजा करत बाप्पाचे केले विसर्जन

कल्याण: कोरोना महामारीने संपुर्ण जगात थैमान घातले आहे प्रत्येक माणूस या महामारी मध्ये आस्थावेस्थ झाल्याचे दिसून येत आहेत. कोरोनाचा परिणाम हा जन जीवनावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे.सणावारावरही कोरोनाचे मोठे सावट आहे  गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन ही अगदी साध्या पद्धतीने होत असून . बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले की विसर्जनाला घेऊन जाण्याआधी त्याची उत्तरपूजा केली जाते. त्यासाठी ब्राम्हण बोलवावे लागतात. मात्र यंदा ही कोरोनाच्या सावटा मुळे बाप्पाच्या पूजेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे, ब्राम्हणाना बोलावता येतं नाही,जर बोलावले तर ब्राम्हण प्रत्येकाला उपलब्ध होईलच याची शाश्वती नाही या सर्व समस्ये वर मार्ग काढण्या साठी कल्याण मधील हितेश जैन यांनी एक शक्कल लढवली ब्राम्हण न बोलवता ऑनलाईन पध्दतीने बाप्पाची पूजा पार पाडली.बाप्पाची उत्तरपूजा करण्यासाठी युट्युब चा वापर करून ऑनलाईन बाप्पाची उत्तर पूजा करून मग बाप्पाचे विसर्जन केले. एक आगळी वेगळी संकल्पना त्यांनी चांगल्या प्रकारे राबवून कोरोना महामारीत सनावारांना पूजा करण्या चांगला मार्ग शोधून काढला आहे.