यूपीएससी परीक्षेत पंढरपुरातील दोन विद्यार्थ्यांचा यश

यूपीएससी परीक्षेत पंढरपुरातील दोन विद्यार्थ्यांचा यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल आज, जाहीर झाला. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण आणि कासेगाव येथील अभयसिंह देशमुख यांनी यश संपादन केले आहे.

तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण यांना यूपीएससी परीक्षेत 109 वा रँक मिळाला आहे. तर कासेगावच्या अभयसिंह देशमुख यांना 151 वा रॅंक मिळाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही युवकांचे शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे पंढरपुरातच झाले.