वीर धरणातून नीरा नदीमध्ये ३२३६८ क्युसेक विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वीर धरणातून नीरा नदीमध्ये ३२३६८ क्युसेक विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर, वडीवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहत असून धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे... वीर धरणाचा एक दरवाजा एक फुटाने उचलण्यात आला असून दि.१३/०८/२०२० रोजी रात्री ७.३० वाजता  नीरा नदीपात्रात ३२३६८ क्युसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ८०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.नीरा नदी पात्रात एकूण ३२३६८ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.