सोलापूर बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी सांडव्याचा भराव गेला वाहून..

सोलापूर बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी सांडव्याचा भराव गेला वाहून..

सोलापूर: जिल्ह्यातील अक्कलकोट  तालुक्‍यातील कुरनूर धरण मागच्या तीन दिवसांच्या जोरदार पावसाने पुन्हा ओसंडून वाहत आहे.आज पहाटे धरणातून पुन्हा तीन दरवाजे उघडून 1800 क्‍युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.तर शिरवळवाडी तलाव तुडुंब भरून मोठ्या प्रमाणावर सांडव्यातून पाणी वाहत असून सांडव्याच्या जवळचे सर्व भराव वाहून गेल्याने गावकऱ्यांना तलाव पलीकडे असणाऱ्या शेतीकडे जाणे अडचणीचे ठरत आहे.