व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले 'हे' नवीन फीचर, व्हिडीओ पाठवताना ठरेल उपयुक्त

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले 'हे' नवीन फीचर, व्हिडीओ पाठवताना ठरेल उपयुक्त

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एक खास फीचर ऍड करण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपमधील हे नवीन फीचर आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या नवीन फीचरच्या मदतीने आता वापरकर्ते व्हिडीओ शेअर करताना त्या व्हिडीओचा आवाज बंद करू शकतात. म्हणजेच आपण पाठवलेला व्हिडीओ दुसऱ्या वापरकर्त्याला प्राप्त होईल तेव्हा त्याला त्या व्हिडीओचा आवाज येणार नाही.

लवकरच सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले हे फीचर

व्हॉट्सअ‍ॅपचे हे म्यूट व्हिडीओ फीचर यापूर्वी बीटा व्हर्जनमध्ये होते. व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन फीचर अद्याप सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले नाही. मात्र येत्या दोन ते तीन दिवसात हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

असा करा व्हिडीओ 'म्यूट'

आपण कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याला म्यूट व्हिडीओ पाठवू इच्छित असल्यास व्हिडीओ सेंडिंग विंडोमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे म्यूट व्हिडीओ फीचर एडिट व्हिडिओ ऑप्शनजवळ दिले गेले आहे. डावीकडे वरच्या बाजूस स्पीकर चिन्ह दिले आहे. व्हिडिओ म्यूट करण्यासाठी, कोणालाही व्हिडीओ पाठविण्यापूर्वी वापरकर्त्यांनी केवळ स्पीकर चिन्हावर टॅप केल्यास तुम्ही पाठवत असलेला व्हिडीओ म्यूट होईल.